माझे आवडते शिक्षक वर निबंध Essay on My Favourite Teacher in Marathi

माझे आवडते शिक्षक वर निबंध Essay on My Favourite Teacher in Marathi: माझा आवडता विषय इंग्रजी असून माझ्या सर्वात आवडत्या शिक्षिका या चित्रा मॅडम आहेत. त्या आम्हाला इंग्रजी शिकवतात. त्या मला खूप आवडतात आणि त्या माझ्या प्रयत्नाचे नेहमीच कौतुक करतात. अवघ्या एक वर्षापूर्वी त्या आमच्या शाळेत आल्या. त्याआधी मला इंग्रजी इतके चांगले येत नव्हते. पण त्यांच्या वर्गात गेल्यावर मात्र आम्ही सगळेच विद्यार्थी या इंग्रजी विषयात खूप हुशार झालो आहोत.

माझे आवडते शिक्षक वर निबंध Essay on My Favourite Teacher in Marathi

माझे आवडते शिक्षक वर निबंध Essay on My Favourite Teacher in Marathi

मला त्या मॅडम अनेक कारणांसाठी आवडतात. सर्व प्रथम, त्या अतिशय मजेशीर आणि मनोरंजक पद्धतीने पुस्तकातील धडे शिकवतात. आम्हाला जर शंका असतील किंवा प्रश्न पडले असतील तरी देखील त्या आमच्यावर कधीच रागावत नाहीत. त्यांचा एक उत्तम गुण म्हणजे त्यांचा असणारा प्रेमळ स्वभाव होय. एकही दिवस न चुकवता त्या रोजच शाळेत येतात.

त्यांचा ड्रेसिंग सेन्स खूपच छान आहे. त्या साधे सलवार सूट घालतात. त्या नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांसोबत अतिशय नम्रपणे आणि आदराने बोलतात. मी त्यांच्या तासाची आतुरतेने वाट बघत असतो आणि माझा इंग्रजी विषयाचा गृहपाठ सुद्धा वेळेवर पूर्ण करतो. चित्रा मॅडम प्रत्येक धड्याचे स्पष्टीकरण देण्याकरिता खूपच मेहनत घेतात.

प्रत्येक धड्याच्या शेवटी पुस्तकात अनेक उपक्रम दिलेले असतात आणि त्या मॅडम आम्हाला त्या सर्वांमध्ये सहभागी करून घेत असतात. इतकंच नाही तर त्या आम्हाला नाटक आणि कविता यांसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यांच्या शाळेतल्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक नियम बनवला.

इंग्रजीच्या तासाला आम्हा सर्वांना इंग्रजीत बोलावे लागते. वाक्य रचना व्याकरण दृष्ट्या जरी अयोग्य वाटत असले तरी प्रत्येक विद्यार्थी इंग्रजीतच बोलण्याचा प्रयत्न करतो. सोबतच त्यांनी आम्हाला एकमेकांच्या चुकांवर कधीही न हसायला शिकवले आहे. यामुळे आमचे इंग्रजीतील बोलणे/संभाषण खूपच चांगले झाले आहे. आता तर आम्ही सर्वजण अधिक आत्मविश्वासाने इंग्रजीमध्ये बोलू शकतो.

त्यांचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे त्या प्रत्येकच मुलाशी समानतेने वागतात. आम्हाला धडा समजावून सांगितल्यानंतर, त्या आम्हा प्रत्येक विद्यार्थ्यांला धड्याबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. कधीकधी, त्या आम्हाला आमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल देखील इंग्रजीत बोलायला सांगतात, जसे की आम्हाला आमच्या जीवनाबद्दल काय स्वप्न आहेत, आमचे पालक आमच्या चांगल्या भविष्यासाठी कसे  मेहनत करतात. इ.

जेव्हा आम्ही विद्यार्थी गोंधळलेले असतो किंवा आम्हाला भावनिक आधाराची गरज असते त्यावेळी आपले मन मोकळे करण्यासाठी त्या सर्वोत्तम व्यक्ती असतात. त्यांचा सल्ला आणि सूचना या आमच्यासाठी नेहमीच सकारात्मक असतात. गेल्या महिन्यात, शिक्षक दिनाच्या दिवशी, सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासाठी भेटवस्तू सुद्धा आणल्या. तसेच आम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी एक गाणे देखील गायले.

मी त्यांच्यासाठी एक सुंदरसे ग्रीटिंग कार्ड आणि त्याच्या सोबत एक लाल गुलाब घेऊन आलो होतो. त्यांनी हसतमुखाने ते सर्व  स्वीकारले आणि प्रत्येक गोष्टीसाठी आम्हा विद्यार्थ्यांचे आभार मानले. त्या मॅडमच्या रुपात माझ्या जीवनात मला प्रत्येक प्रकारे साथ देणारा असा अतिशय हुशार आणि महान शिक्षक मिळाल्याबद्दल मी त्यांचा  नेहमीच कृतज्ञ आहे.




About Author: