माझी आजी वर निबंध Essay on My Grandmother in Marathi: आजी ही प्रत्येक मुलाला खूप जास्त प्रिय असते. कारण ती मुलांचे खूप जास्त लाड करत असते. आजी ही आपले सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते. मला देखील माझी आजी खूप प्रिय आहे. माझी आजी आता म्हातारी झाली आहे मात्र तरी देखील ती माझ्या आईला घरकामात मदत करते. माझी आजीच आहे जी मला रात्री झोपण्याआधी परिकथा सांगून झोपवत असते. माझी आजीच मला घरी माझ्या आवडीचे काही खायला बनवलेलं नसेल तर स्वताच्या हाताने बनवून खाऊ घालते.
माझी आजी वर निबंध Essay on My Grandmother in Marathi
आजी खूपच जास्त प्रमाणात धार्मिक आहे. ती सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळा परमेश्वराचे नित्यानियमाने पूजन करते आणि आरती देखील करते. त्यांना झाडांवर देखील खूप प्रेम आहे आणि त्यामुळे त्यांनी घरात आणि घराच्या परिसरात अनेक फुलझाडे व इतर झाडी लावलेली आहेत. या फुल झाडांमुळे घराची शोभा वाढते. आजीच असते जी तिच्या स्वताच्या मुलांपेक्षा मुलांच्या मुलांवर जास्त प्रेम करते. आजीच आहे जी मला वडिलांच्या रागापासून वाचविते. कोनी मला काही बोलले तर आजी सगळ्यांना ऐकविते.
माझी आजी मला सण आणि उत्सवांच्या गोष्टी सांगते आणि सणांविषयी असलेले रीती रिवाज समजावून सांगते. मी आजारी असल्यानंतर डॉक्टर कडे न पाठवता स्वतः काहीतरी घरघुती उपाय करून मला काढे देते. माझी आजी सर्वांना चांगल्या आणि वाईट गोष्टींमधील फरक समजावून सांगते. योग्य मार्गावर चालायला देखील आजी शिकविते. घरावर असलेल्या मायेच्या सावलीप्रमाने माझी आजी आहे. माझ्या आजीच्या निर्णयानुसार घरातील सर्व कामे होतात. मला माझी आजी खूप जास्त आवडते.