माझी बहिण वर निबंध Essay on My Sister in Marathi

माझी बहिण वर निबंध Essay on My Sister in Marathi: मला माया नावाची एक बहिण आहे. सध्या माया इयत्ता सहावी मध्ये शिकते. अगदी बालपणपासून तिच्यामध्ये खूप प्रतिभा आहे. ती हुशार आहे. ती आत्तापर्यंत तिच्या वर्गात प्रत्येक वेळी पहिल्या क्रमांकाने पास झालेली आहे. तिच्या मध्ये असलेली काही गुण कौशल्ये मला नेहमीच आश्चर्यचकित करत असतात.

माझी बहिण वर निबंध Essay on My Sister in Marathi

माझी बहिण वर निबंध Essay on My Sister in Marathi

ती नियमित पणा पाळणारी व्यक्ती आहे. तिला वक्तशीरपणा पाळणे जास्त आवडते. ती तिचा वेळ चांगल्या प्रकारे ठरवते आणि त्यामुळे तिला वेळेच्या बाबतीत कधी उशीर होत नाही किंवा कधीही काही अडचण येत नाही.  ती कधीच शाळा बुडवत नाही. आपल्या शाळेच्या सोबत जोडले जाणे ही खूप चांगली गोष्ट असते. ती तिच्या मित्रांना देखील अभ्यासात मदत करते. ती गणित विषयात चांगली आहे आणि त्यामुळे इतरांना गणितात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ती नेहमी मदत करते.

इतक्या लहान वयातच तिने पुस्तके वाचायला सुरुवात केली आहे. माझ्या मते तिच्या भविष्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. मी तिच्या वागण्याचे नक्कीच कौतुक करतो. मी माझ्या बहिणीवर खूप प्रेम करतो. ती तिचा भरपूर वेळ हा घरात माझ्यासोबत घालवते. आमच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे संबंध असून आम्ही एकमेकांना समजून देखील घेतो.

मी माझ्या बहिणीवर खूप प्रेम करतो. माझी बहिण माझ्यासाठी राणी आहे. माझ्या आई वडिलांकडून मिळालेले हे सर्वात सुंदर गिफ्ट आहे.
About Author: